अहमदनगर |१४ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Politics शहर परीसरात आमदारकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचारार्थ सुरू असलेली ‘नगर परिवर्तन यात्रा’ काल सावेडी उपनगरातील सिव्हिल हडको, गणेश चौक, शिवतेज चौक, लॉईड कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, गंगा उद्यान परिसर, जॉगिंग ट्रॅक, मिस्किन मळा या भागात होती. तेंव्हा काही जणांनी कळमकर यांना सांगितले, आम्ही स्टेटस ठेवले तरी कोणीतरी फोन करतो. कोणीतरी “कशाला भानगडीत पडता” असे म्हणतो. अशा तक्रारी केल्यावर कळमकर यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले, समोरचा विद्यमान आमदार आहे किंवा जे पण उमेदवार माझ्या विरोधी आहे, मी त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही जेवढ्या धमक्या देत आहे जेवढी दडपशाही करत आहेत प्रत्येक धमकीला प्रत्येक दडपशाहीला तुमचे एक हजार मत मला मिळणार आहे. तुम्ही जी हुकुमशाही करीत आहे, ही संपूर्ण नगर शहराला आणि जिल्ह्याला माहित आहे. शहरात बिंगो, मटका, जुगारासारखे अवैध धंदे कोणाच्या कृपाशिर्वादाने चालतात? ताबेमारी मागे ‘मास्टरमाइंड’ कोण आहे ? हे शहरासह जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे नागरिक यावेळी निर्भय मतदान करून, निकालानंतर ही दहशत नक्कीच मोडीत काढणार आहे. कंटाळलेले लोक मतपेटीतून तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.
ते पुढे म्हणाले, प्रचारादरम्यान फिरत असताना लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. पण शहरात दहशत मोठ्या प्रमाणात असल्याने महिला, नागरिक, तरुण मुले आज सोशल मिडियावरसुध्दा व्यक्त होताना दिसत नाही परंतु निकालानंतर दहशत नक्कीच मोडीत निघणार आहे, असे परखड मत कळमकर यांनी यात्रेदरम्यान मांडले.
प्रचारफेरीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही भागात लोकांनी घरावरुन त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली तर महिला औक्षण करताना पाहायला मिळाल्या. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक एक सुशिक्षित आणि सामाजिक, वैचारिक भान असलेला उमेदवार असल्याने कळमकर यांचे कौतुक करीत होते.
हे हि वाचा : Election: मतदान करण्याची ऑनलाईन शपथ घ्या आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळवा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.