अकोले | २७ ऑक्टोबर | प्रतिनिधी
Politics अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक सिताराम पाटील गायकर यांना आपल्या आयुष्याची तब्बल ५० वर्षे अकोले या आदिवासी बहुल, डोंगरदऱ्या पर्वतीय प्रदेशात सहकार फुलावा म्हणून खर्ची घातले. त्या परिश्रमातून उमलेल्या कर्तव्य फुलातून दरवळणाऱ्या सुगंधाला नाशिक येथील मार्कंडेय प्रकाशन संस्था, काळी माती, आपली दुनियादारी, नायक वृत्तपत्र समूह यांच्या वतीने सहकारमहर्षी पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मार्कंडेय प्रकाशनचे संचालक कुमार कडलग, कार्यकारी व्यवस्थापक रश्मी मारवाडी यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
ता.२६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील रोटरी क्लब सभागृहात चार वाजता महंत स्वामी सोमेश्वरानंद, स्वामी कंठानंद, नाशिक पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, नायकचे संपादक गोरख मदने, सुधिर ऊंबाळकर, हेमंत काळमेघ, महेश साळूंखे, देवीदास बैरागी, अश्विनी पुरी, मच्छिंद्र साळूंके, बाळासाहेब अस्वले, नितीन भालेराव, इम्रान शेख आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती कैलास वाकचौरे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाश मालूंजकर, अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन तथा अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक अशोक देशमुख, अगस्ती सहकारी कारखान्याचे माजी संचालक तथा युवकांचे प्रेरणास्थान महेश नवले, अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक विकास शेटे, रोहिदास भोर, अगस्ती पतसंस्थेचे संचालक निलेश गायकर, प्रमोद मंडलिक, शामराव वाकचौरे, अक्षय आरोटे, सुमित जाधव, रावसाहेब भोर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पुरस्काराबद्दल अकोले तालुक्यासह जिल्ह्यातून स्वागत करून अभिनंदन करण्यात येत आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.