Politics | 26 वर्ष पुरोगामी विचारांची वाटचाल; राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य वर्धापनदिन सोहळा

संस्थापकांनी घालून दिलेल्या विकास, लोकशाही मूल्ये, आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

पुणे | ८ जून | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला यंदा २६ वर्षे पूर्ण होत असून, या गौरवशाली वाटचालीच्या निमित्ताने पक्षाचा भव्य वर्धापन दिन सोहळा येत्या १० जून २०२५ रोजी मंगळवारी, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या या सोहळ्याला पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह इतर अनेक मान्यवर नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

“पुरोगामी विचारांची २६ वर्षांची वाटचाल” ही संकल्पना घेऊन साजरा होत असलेला हा कार्यक्रम, पक्षाच्या समाजहितार्थ कामगिरीची उजळणी करणारा आणि नव्या वाटचालीसाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे.

पक्षाच्या संस्थापकांनी घालून दिलेल्या विकास, लोकशाही मूल्ये, आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार या वर्धापन दिनाद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट केला जाणार आहे. नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिवर्तनाच्या या ऐतिहासिक यात्रेचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *