राहुरी | २२ सप्टेंबर | प्रतिनिधी
Politics महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाध्यक्ष अमित ठाकरे व सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटक सागर माने, जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शाळा महाविद्यालयांची झाडाझडती घेण्यात आली. बदलापूर येथील लैंगिक अत्यचारासंदर्भात आपल्या शाळा महाविद्यालय सुरक्षिततेची काळजी घेतली जाते किंवा नाही, यासाठी सर्वांना निवेदन देण्यात आले.
आपण आपल्या महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीत जशी दखल घेतो त्याचप्रमाणे महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, शिक्षक, सफाई कामगार, शिपाई, सुरक्षा कर्मचारी दैनंदिन महाविद्यालयात व परिसरात असणाऱ्या व्यक्ती यांच्याबाबत आपण सतर्क असणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले.
यावेळी मनविसेचे तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे, शहराध्यक्ष संदेश गायकवाड, उपशहराध्यक्ष प्रसाद लोखंडे, विभागाध्यक्ष उमेश तमनर, मनसे शहराध्यक्ष प्रतीक विधाटे, राहुल पिले, युवराज कोकाटे, तुषार पवार आदींसह मनसे सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.