Politics: महाराष्ट्रातील महीलांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात मविआ व डाव्या पक्षांची ‘मुक निदर्शने’

69 / 100 SEO Score

शेवगाव | २८ ऑगस्ट | प्रतिनिधी

बदलापूर येथील चिमुरड्यांवर झालेल्या अत्यंत घृणास्पद अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ व महाराष्ट्रातील महीलांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात आज महाविकास आघाडी व डाव्या पक्षांच्या वतीने मुक निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. शेवगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना व कॉंग्रेस पक्षाच्या वतीने येथील आंबेडकर पुतळ्यासमोर तोंडावर काळी पट्टी बांधून Politics मुक निदर्शने करण्यात आली.

यावेळी शेवगावचे माजी सभापती अरुण पाटील लांडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, जिल्हा सहसेक्रेटरी कॉ. संजय नांगरे, कॉ. बबनराव पवार, दत्तात्रय आरे, कॉ. राम लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिश भारदे, बाळासाहेब डाके, राहुल मगरे, शरद सोनवणेे, एजाज काझी, संजय गवळी, रमेश ढाकणे, वजीर पठाण, अप्पासाहेब मगर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते एकनाथ कुसाळकर,भारत लोहकरे, शिवाजी मडके, काॅंग्रेस(आय)चे धनंजय डहाळे, समीर काझी, कचरु मगर, आशा कर्मचारी गीता थोरवे, शितल थोरवे, सुनेत्रा महाजन, तारामती दिवटे, रत्नमाला क्षिरसागर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *