मुंबई | गुरुदत्त वाकदेकर
पहिल्या दोन बाउट्समध्ये आघाडीवर असूनही, भारतीय बॉक्सर निशांत देव पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ७१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मेक्सिकोच्या मार्कोकडून पराभूत होऊन बाहेर पडला. या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या निशांतने चांगली सुरुवात केली परंतु त्याला १-४ ने पराभवाचा सामना करावा लागला. पदक निश्चित करण्यासाठी त्याला हा सामना जिंकावाच लागणार होता. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये भारताचे आव्हान फक्त टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोरगोहेनच्या रूपात उरले आहे, ती रविवारी महिलांच्या ७५ किलो गटात चीनच्या ली कियान विरुद्ध खेळेल.
भारतीय नेमबाज महेश्वरी चौहान महिला स्कीट स्पर्धेच्या पात्रतेच्या पहिल्या दिवशी आठव्या स्थानासह अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या शर्यतीत कायम आहे. २५-२५ शॉट्सच्या तीन मालिकेत २३, २४ आणि २४ गुणांसह एकूण ७१ गुण मिळवणारी महेश्वरी पहिल्या दिवसाच्या पात्रता फेरीनंतर आठव्या स्थानावर आहे आणि अव्वल सहा नेमबाजांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या शर्यतीत कायम आहे. या स्पर्धेत सहभागी होणारा आणखी एक भारतीय रजा धिल्लन २१, २२ आणि २३ गुणांमधून ६६ गुण मिळवून २९ नेमबाजांमध्ये २५ व्या स्थानावर आहे.
भारतीय नेमबाज अनंतजितसिंग नारुका याला पात्रता फेरीच्या दुसऱ्या दिवशी निराशाजनक कामगिरी करून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुषांच्या स्कीट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविता आला नाही. २३, २२, २३, २४, २४ अशा २५-२५ शॉट्सच्या पाच मालिकेत एकूण ११६ गुण मिळवून अनंतजीतने ३० नेमबाजांमध्ये २४ वे स्थान मिळविले. अव्वल सहा नेमबाजांनी अंतिम फेरी गाठली.
गेल्या आठ सामन्यांमध्ये आघाडी घेतल्यानंतरही दीपिकाला पराभवाला सामोरे जावे लागले. दीपिकाने पहिला सेट २८-२६ असा जिंकला होता, तर कोरियाच्या सु येओनने दुसऱ्या सेटमध्ये दीपिकाचा २८-२५ असा पराभव केला होता. यानंतर दीपिकाने तिसरा सेट २९-२८ अशा फरकाने जिंकला, तर सु येऑनने चौथ्या सेटमध्ये पुनरागमन करत हा सेट २९-२७ असा जिंकला आणि ४-४ अशी बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये दीपिका मागे पडली आणि सु येऑनने हा सेट २९-२७ असा जिंकला आणि दीपिकाला ६-४ अशा फरकाने पराभूत केले. अशाप्रकारे दीपिकाचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपला.
भजनला शूटऑफमध्ये इंडोनेशियाच्या चारू निशाला दया नंदाकडून पराभव पत्करावा लागला. पाच सेटनंतर स्कोअर ५-५ असा बरोबरीत राहिल्याने सामना शूट ऑफमध्ये पोहोचला. बुल्स आय, म्हणजेच ज्या शूटरचा बाण मध्यापासून दूर आहे तो हरेल. चारू निशा नऊ वर आणि भजनचा शॉट आठ वर लागला आणि ती बाद झाली.
मनू भाकर शानदार सुरुवातीनंतर मागे पडली आणि चौथ्या स्थानावर राहून पदकापासून वंचित राहिली.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.