मुंबई | ३० मार्च | गुरूदत्त वाकदेकर
(Mumbai news) दक्षिण मुंबईतील कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग उन्नत मार्गा’चे ता.३० मार्च रोजी लोकार्पण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.
(Mumbai news) यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे आदी मान्यवर उपस्थित होते. हा उन्नत मार्ग नागरिकांसाठी पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुला राहणार आहे. निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in या लिंकवरून सशुल्क ऑनलाइन तिकीट बूक करता येणार आहे.
(Mumbai news) निसर्गाच्या कुशीतील खजिना पाहण्याचा नागरिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.