Mumbai News: २३ डिसेंबरला ६३ व्या ‘महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा’ केंद्राचे उद्घाटन

सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर होणार

मुंबई | १७ डिसेंबर | गुरुदत्त वाकदेकर

(Mumbai News) महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-३ केंद्र ता.२३ डिसेंबर रोजी सुरू होत आहे. ही स्पर्धा साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात आली.

(Mumbai News) स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-३ केंद्रावर सुरू होत आहे. या स्पर्धेमध्ये विविध २० नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.

स्पर्धेचे वेळापत्रक 

सोमवार, २३ डिसें. २०२४, सायं. ७ वा. कॅनिबल लेखक : डॉ. तृप्ती झेमसे दिग्दर्शक : अभिषेक भगत टाऊन लायब्ररी, नवी मुंबई
मंगळवार, २४ डिसे. २०२४, सायं. ७ वा. मोक्ष लेखक : महेंद्र कुरघोडे दिग्दर्शक : विराज नारायण नारिंग्रेकर स्टेट बैंक ऑफ इंडिया, मुंबई मेट्रों सर्कल, मुंबई
शुक्रवार, २७ डिसें. २०२४, स. ११:३० वा. ज्योतिषाचे तीन तेरा लेखक व दिग्दर्शक : राजेश मयेकर स्वयंदीप प्रतिष्ठान, मुंबई
शुक्रवार, २७ डिसें. २०२४, सायं. ७ वा. मराठी माणूस नॉट अलाऊड लेखक व दिग्दर्शक : शशांक वामनोलकर सम्यक कालांश प्रतिष्ठान, मुंबई
शनिवार, २८ डिसें. २०२४, स. ११:३० वा. घर त्या तिघांचं लेखक व दिग्दर्शक : आबा पेडणेकर साई कला व सांस्कृतिक ट्रस्ट, मुंबई
शनिवार, २८ डिसें. २०२४, सायं. ७ वा. द हंग्री क्रो लेखक : डॉ. सोमनाथ सोनवलकर दिग्दर्शक : सुरेश गांगुर्डे मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन, मुंबई
सोमवार, ३० डिसें. २०२४, स. ११:३० वा. कायाप्पाचा पाडा लेखक: देवेंद्र काळसेकर दिग्दर्शक : नम्रता काळसेकर सह प्रमुख कामगार अधिकारी, पूर्व उपनगरे बृहन्मुंबई म.न.पा.
सोमवार, ३० डिसें. २०२४, सायं. ७ वा. गलती से मिस्टेक लेखक व दिग्दर्शक : प्रतिमा कांबळे प्रभात मित्र मंडळ, मुंबई
मंगळवार, ३१ डिसें. २०२४, स. ११:३० वा. तुझ्या रुपात मी… लेखक व दिग्दर्शक : संदेश जाधव प्रवेश कला क्रीडा मंच, मुंबई
बुधवार, १ जाने. २०२५, स. ११:३० वा. मीठ आणि भुसा लेखक व दिग्दर्शक : विठ्ठल सावंत पटेलवाडी मित्र मंडळ, मुंबई
बुधवार, १ जाने. २०२५, सायं. ७ वा. वा गुरु लेखक : डॉ. चंद्रशेखर फणसळकर दिग्दर्शक : गिरीश मयेकर मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्टस क्लब, मुंबई
गुरुवार, २ जाने. २०२५, स. ११:३० वा. इम्युनिटी (द व्हाईस ऑफ टॉलरन्स) लेखक : डॉ. सोमनाथ सोनवलकर दिग्दर्शक : महेंद्र दिवेकर मोरगा प्रतिष्ठान, मुंबई
गुरुवार, २ जाने. २०२५, सायं. ७ वा. इन्शाअल्ला लेखक: चेतन दातार दिग्दर्शक : सुशील इनामदार बृहन्मुंबई पोलीस कल्याण निधी, मुंबई
शुक्रवार, ३ जाने. २०२५, स. ११:३० वा. वारुळ लेखक : राजेंद्र पोळ दिग्दर्शक : मिलिंद सावंत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई
शुक्रवार, ३ जाने. २०२५, सायं. ७ वा. संघर्ष जगण्याचा.. लक्षवेध एकलव्याच्या ध्येयपूर्तीचा लेखक: युवराज संतोष दिग्दर्शक: सुभाष गोतड कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई
शनिवार, ४ जाने. २०२५, स. ११:३० वा. धुमशान लेखक : मनोहर कदम दिग्दर्शक: आत्माराम धर्णे अरुणोदय नगर मित्र मंडळ, मुलुंड (पूर्व)
शनिवार, ४ जाने. २०२५, सायं. ७ वा. स-टायर लेखक: डॉ. मंगेश क्षीरसागर दिग्दर्शक : अशोक साळवी अनुराग, मुंबई
रविवार, ५ जाने. २०२५, सायं. ७ वा. ढाई अक्षर प्रेम के लेखक व दिग्दर्शक : डॉ. शिरीष ठाकूर अमृत कलश फाऊंडेशन, मुंबई
सोमवार, ६ जाने. २०२५, सायं. ७ वा. मी तर बुआ अर्धा शहाणा लेखक : राजा पारगावकर दिग्दर्शक : दशरथ कीर आकांक्षा फाऊंडेशन, मुंबई
बुधवार, ८ जाने. २०२५, सायं. ७ वा. ओॲसिस, लेखक : इरफान मुजावर दिग्दर्शक : सुगत उथळे सचिवालय जिमखाना, मुंबई
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्यावतीने विकास खारगे (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच विभीषण चवरे संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीतजास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नाट्यसंस्थांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच https://www.rangabhoomi.com/tickets/63rd-haushi-marathi-rajya-natya-spardha/ ‘रंगभूमी डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकींग करता येणार आहे.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *