मुंबई | ०४ ऑगस्ट | गुरुदत्त वाकदेकर
(Mumbai news) समाजसेवेच्या क्षेत्रात गेली सहा दशके कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ सायन या संस्थेचा ६१ वा वर्धापनदिन आणि नवीन कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा माटुंगा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. लायन राजेश रसिकलाल शाह यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
(Mumbai news) या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर लायन राजू मनवानी यांच्या हस्ते अध्यक्ष व कार्यकारिणीने शपथ घेतली. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन फिरोज कात्रक यांनी १५ नवीन सदस्यांचे इंडक्शन करून क्लबच्या कार्याचा विस्तार साधला.
(Mumbai news) कार्यक्रमात लायन क्रिस्टीन स्वामीनाथन यांनी वर्ष २०२४-२५ या कार्यकाळाचा अहवाल प्रभावीपणे सादर केला. अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लायन राजेश शाह यांनी आपल्या मनोगतातून सांगितले, सायन क्लब आणि जीओ रोटी घर या माध्यमातून गरजू, उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी सेवा हाच आमचा प्राधान्यक्रम राहणार आहे.
क्लबच्या माध्यमातून झोपडपट्टी, वृद्धाश्रम, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, पोस्ट ऑफिस, कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि रस्त्यावरच्या मुलांसाठी अल्पोपहार व जेवणवाटपाचे उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. तसेच वह्या, स्टेशनरी किट्स, छत्र्या, रेनकोट वाटप, आणि रुग्णांसाठी औषध पुरवठा यांसारखे प्रकल्पही चालू आहेत.
समारंभास फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन पवन अग्रवाल, सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन हुजैफा घड़ियाली, अनेक पास्ट डिस्ट्रिक्ट गवर्नर, लायन सदस्य आणि राजेश शाह यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे संचालन लायन संतोष चौहान, रीटा अतुल संघवी आणि राकेश सिंह यांनी केले. संपूर्ण सोहळा लायन वसंत खेतानी आणि रीना खेतानी यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडला.
संयुक्त सचिव शेतल शाह यांनी आगामी उपक्रमांचा आढावा सादर केला, तर प्रदर्शन सचिव सोनी सिंह यांनी प्रमुख अतिथी व लायन सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. संपूर्ण शपथविधी सोहळा हा सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची प्रेरणा देणारा ठरला.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.