mumbai news: मनोरंजनाची चटकदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला होणार चित्रपटगृहात दाखल

69 / 100 SEO Score

मुंबई | १६ सप्टेंबर | मनोरंजन प्रतिनिधी

mumbai news झणझणीत, तिखट, कुरकुरीत, आंबट-गोड पदार्थ म्हटले की, पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटले की, प्रत्येकाच्या तोंडाला लगेच पाणी सुटते आणि मनालाही ते खाण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात आपल्याला चाखायला मिळणार आहे. एस.के.प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार अशी माहिती निर्माते संजीवकुमार अग्रवाल, सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल यांना दिली.

प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट असते. कधी खूप आनंद, प्रेम, विश्वास देणारी तर कधी सोबत दुःख घेऊन येणारी. अशाच लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट घेऊन ‘पाणीपुरी’ हा चित्रपट आपले मनोरंजन करणार आहे. मकरंद देशपांडे, सायली संजीव, ऋषिकेश जोशी, विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर, अभय गिते आदी कलाकार आपल्या मनोरंजनातून ‘पाणीपुरी’ची चव आपल्याला चाखायला देणार आहेत.

चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे, पटकथा-संवाद संजय नवगिरे यांचे आहे. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले, गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *