mumbai news: 14 वर्षापासून 40 हजारपेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या; नगर पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी विक्रम राठोड सक्रीय

रयत समाचार वृत्तसेवा
4 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आष्टी-नगर ऐवजी ‘आष्टी-मुंबई रेल्वेसेवा’ सुरू करण्याची मागणी

अहमदनगर | ८ जानेवारी | प्रतिनिधी

(mumbai news) शहराचा विकास, बेरोजगारी, शिक्षण व्यापार या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नगर पुणे शटल इंटरसिटी रेल्वेसाठी शिवसेना युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले. मुंबई येथे मंत्रालयात त्यांना प्रत्यक्ष भेटून मागणी केली. यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे देखील त्यांच्यासोबत होते. दोघांनी या प्रश्नाविषयी सविस्तर चर्चा केली. प्रश्न लवकरात लवकर सोडवू त्यासाठी रेल्वेमंत्र्यांसोबत संपर्क साधू असे आश्वासन दोघांनी यावेळी दिले.mumbai news

(mumbai news) याविषयी राठोड यांनी म्हटले की, शहराच्या दृष्टीने अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला व अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु होण्यासाठी आम्ही वारंवार सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक- यांची भेट घेऊन मागण्या केल्या. मागील १४ वर्षापासून ४० हजारपेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या दौंडमध्ये कॉर्डलाईन, विद्युतिकरण आणि रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. शटल ट्रेनसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. इतकेच नव्हे तर लहान तालुका असलेल्या दौडमधून पुण्यासाठी एक दैनंदिन शटल ट्रेन आहे. नगर एक प्रमुख स्थान असून भारतातील एक मोठे आर्मी बेस आहे.

नगर व पुणे दरम्यान दररोज २० हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करतात, तर आठवड्याच्या शेवटी ही संख्या ४० हजारापर्यंत पोहोचते. नगर-पुणे दैनंदिन इंटरसिटी ट्रेनमुळे इंधन बचत, प्रदूषण आणि अपघात कमी होतील. दररोज २० हजारापेक्षा अधिक प्रवासी या सोयीचा लाभ घेऊ शकतील. नागरिकांसह सेना दल, रेल्वे पोलिस यांनाही याचा फायदा होईल. रेल्वे उत्पन्नात वाढ होईल, दरवर्षी सुमारे ५ कोटी रुपये मिळू शकणार.
अहिल्यानगर येथून सकाळी ६ वाजता शटल ट्रेन आणि पुण्याहून सायंकाळी ६:३० वाजता अहिल्यानगरकडे इंटरसिटी ट्रेन चालवावी, पर्यायी सर्व पॅसेंजर गाड्या बंद असल्याने पुणे- निजामाबाद आणि दौंड-नांदेड या दोन डेमू रेल्वेला प्रत्यक स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात येत आहे. आहे
      मंत्रालयाने महत्प्रयासाने आष्टी नगर रेल्वे सुरु केली. मात्र या रेल्वेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता या रेल्वेचा फ्लॉप शो झाला आहे. प्रत्यक्षात ही रेल्वे आष्टी-नगर-दौंड कॉडलाईन-पुणे आणि पुढे मुंबई अशी धावायला हवी होती. आपल्या नगर स्थित रेल्वे कर्मचाऱ्यांचे ड्युटीचे तास पूर्ण व्हावेत आणि त्यांना परत नगर मुक्कामी येता यावे या माफक उ‌द्देशाने ही रेल्वे सकाळी नगरहून आष्टीला सोडली आणि ती दुपारी २ पर्यंत परत नगरला आणली. आता या शटलची दुसरी फेरी दुपारी परत नगरहून आष्टीकडे सोडण्यात येणार आहे आणि सायंकाळी आष्टीहून निघून ती नगरला आणण्यात येणार आहे. पण या रेल्वेला प्रवाशांचा अतिशय अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. तरीदेखील या फ्लॉप शोचा रिपीट टेलिकास्ट करण्याचा घाट रेल्वेने घातला आहे. ही रेल्वे जर आष्टी नगर-दौंड-पुणे-मुंबई अशी सुरु झाली तर तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. बीड, आष्टी, जामखेड आणि नगरहून पुण्याला दिवसाला पाच लाखाहून अधिक लोक ये-जा करीत असतात. नगर पुणे रोडवरील सूप टोल नाक्यावर याची नोंद आहे तसेच नगर-पुणे मार्गावर दररोज २ हजाराहून अधिक एसटी आणि खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूक होते.
नगरमधील शेकडो वि‌द्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात राहतात. त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. थेट रेल्वे सुरू झाल्यास दीड तासात ते पुण्याला पोहोचू शकतील. आपल्या घरी राहूनच शिक्षणासाठी ये-जा करू शकतील. रेल्वेअभावी प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. त्यामुळे लवकरात लवकर आष्टी नगर-दौंड क्वाडलाईन-पुणे-मुंबई रेल्वे चालू करावी अशी विनंती राठोड यांनी केली आहे.
आष्टी-नगर-पुणे-मुंबई रेल्वे शटल एक्स्प्रेस सुरु करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड यांनी केली. यावेळी दिलदारसिंह बीर, मुन्ना भिंगारदिवे, नरेश भालेराव, महेश शेळके, विशाल गायकवाड आदि सहकारी शिवसैनिक उपस्थित होते.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading