मुंबई | १५ सप्टेंबर | गुरुदत्त वाकदेकर
mumbai news ‘स्वामी’ संस्था पितृपक्षादरम्यान ता.१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या १६ दिवसांच्या कालावधीत अन्नदान मोहीम राबवत असते. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे गरीब, गरजू आणि मुंबईत उपचार घेत असलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसह धान्य उपलब्ध करून देणे.
संस्था दानशूर व्यक्तींना त्यांच्या प्रियजनांच्या स्मरणार्थ त्या संबंधित तारखांना अन्नदान करण्यासाठी आमंत्रित करते. धान्य, रोख रक्कम, धनादेश किंवा ऑनलाइन व्यवहाराच्या स्वरूपात देणगी दिली जाऊ शकते. कलम ८०जी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्रता सुनिश्चित करण्यासाठी योग्य पावती प्रदान केली जाते.
अधिक माहितीसाठी आणि या उदात्त कार्यात सहभागी होण्यासाठी 8928061391 वर संपर्क साधण्याचे स्वामी च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. तसेच भ्रमणध्वनीवर ऑनलाइन पेमेंट व्यवहाराचा स्क्रीनशॉट पाठवावा अशी विनंतीही करण्यात आली.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.