कोल्हापूर | २९.४ | रयत समाचार
(Literature) छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा केवळ जयजयकार न करता तो समजून घेऊन आचरणात आणण्याचे आवाहन करत, गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? हे पुस्तक विशेष सवलतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. साधारणपणे ५ हजार रूपये किंमतीच्या १०० प्रती आता केवळ २,८०० रूपयांमध्ये घरपोच देण्याची योजना जाहीर करण्यात आली.
सर्व पक्ष, मंडळे, संस्था आणि संघटनांनी शिवाजी महाराजांचा विचार केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता तो आत्मसात करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
(Literature) गेल्या ३५० वर्षांहून अधिक काळानंतरही शिवाजी महाराज सामान्य रयतेच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत, यामागचे खरे कारण काय, याचे प्रभावी उत्तर या पुस्तकातून मिळते. या ७६ पानांच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचे वेगळेपण अत्यंत सोप्या आणि ठोस संदर्भांसह मांडले आहे.
(Literature) ‘शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका’ असा सैन्याला आदेश देणारा राजा, परस्त्रीला मातेसमान मानणारा आदर्श शासक, सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन रयतेचे राज्य उभे करणारा नेतृत्वकर्ता, अशा अनेक पैलूंमधून शिवाजी महाराजांची खरी ओळख या पुस्तकातून उलगडते.
इतक्या व्यापक विचारांचे सार या पुस्तकात इतक्या प्रभावीपणे मांडले आहे की, हजारो पानांमध्येही ते सांगणे कठीण वाटावे. पुस्तकांसाठी 8421229935 / 8888121345 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
