अहमदनगर | ६.६ | रयत समाचार
(Literature) महाराष्ट्रातील पत्रकारिता, कामगार चळवळ आणि सामाजिक बांधिलकी यांचा इतिहास जपणाऱ्या एका महत्त्वपूर्ण दस्तऐवजाचे प्रकाशन लवकरच होणार आहे. कामगार, कष्टकरी, दलित आणि वंचित समाजाच्या आर्थिक सहकार्याने सुरू झालेले आणि तब्बल नऊ वर्षे सातत्याने चाललेले ‘दैनिक श्रमिक विचार’ या ऐतिहासिक वृत्तपत्राच्या संपूर्ण प्रवासावर आधारित ‘श्रमिक विचार चे अंतरंग’ हे पुस्तक येत्या १८ जून २०२६ रोजी संभाजीनगर येथे प्रकाशित होणार आहे.
(Literature) या संदर्भात माहिती देताना निलीमा बंडेलू जाधव यांनी सांगितले, कोणतीही जाहिरात, आर्थिक पाठबळ किंवा कॉर्पोरेट मदत नसताना केवळ सामाजिक बांधिलकी, विचारांची निष्ठा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टातून ‘दैनिक श्रमिक विचार’ तब्बल नऊ वर्षे सुरू राहिले. त्यामुळे हे केवळ वृत्तपत्र नसून एका सामाजिक आणि वैचारिक चळवळीचा दस्तऐवज ठरले.
(Literature) डॉ. विवेक घोडेराव यांनी सादर केलेल्या या वस्तुनिष्ठ संशोधन प्रबंधामध्ये ‘दैनिक श्रमिक विचार’चा संपूर्ण इतिहास, त्याचे अंतरंग, अग्रलेख, विचारधारा, संघर्ष आणि पत्रकारितेतील योगदान यांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. पत्रकार, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
‘श्रमिक विचार’चा प्रवास हा केवळ पत्रकारितेचा इतिहास नाही, तर विचार, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत दस्तऐवज आहे.
पुस्तकाची माहिती : पृष्ठसंख्या : २४१. मूळ किंमत : ३५० रुपये. प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत : २७५ रुपये. प्रकाशक : लाल निशान प्रकाशन व कॉम्रेड भास्कर जाधव स्मृती प्रतिष्ठान.
पुस्तकाची प्रत हवी असेल त्यांनी गुगल पे द्वारे रक्कम भरून पावतीसह संपूर्ण पत्ता खालील क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रकाशनानंतर पुस्तक घरपोच उपलब्ध करून दिले जाणार आहे. संपर्क : ८६०५८०७३७७
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
