मुंबई | २६ मार्च | गुरुदत्त वाकदेकर
(Ipl) आयपीएल २०२५ च्या पाचव्या सामन्यात पंजाब किंग्सने (पीबीकेएस) गुजरात टायटन्सवर (जीटी) ११ धावांनी रोमांचक विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक फलंदाजी करत विक्रमी धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यरच्या आक्रमक खेळीमुळे पंजाबने २४३/५ धावांचा डोंगर रचला, तर गुजरातचा संघ २३२/५ धावांपर्यंतच मजल मारू शकला.