(India news) व्यंगचित्रकलेच्या प्रचार प्रसारासाठी तसेच व्यंगचित्रकारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांची संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन ट्रस्ट’ अखेर अधिकृतरीत्या नोंदणीकृत झाली आहे. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर तरुण व्यंगचित्रकारांनी पुढाकार घेत ही संस्था नव्या जोमाने कार्यरत केली आहे.
(India news) ही संस्था काही काळापूर्वी व्यंगचित्रकारांनी नोंदणी करण्याचा संकल्प केला होता. जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने या संस्थेचा पाया घातला गेला होता. विशेष म्हणजे ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन’ हे नावदेखील त्यांनीच सुचवले होते.
(India news) पुढील काळात विविध उपक्रम, कार्यक्रम सुरू असतानाही संस्था अधिकृतरीत्या नोंदणीकृत होऊ शकली नव्हती. अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अखेर तरुण व्यंगचित्रकारांनी जबाबदारी स्वीकारली.
(India news) संस्थेची अनधिकृत कार्यकारिणी बरखास्त करून नव्या कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. तब्बल ४७ व्यंगचित्रकारांनी विश्वास ठेवून नोंदणीसाठी देणगी दिली, त्यामुळे या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले.
गेल्या पाच महिन्यांपासून सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून संस्था अधिकृतरीत्या नोंदणीकृत करण्यात आली, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
नव्या कार्यकारिणीत गौरव सर्जेराव (अध्यक्ष), अमित पापळ (उपाध्यक्ष), धनराज गरड (सचिव), नीरज सबनीस (प्रसिद्धी प्रमुख), रोहित कबाडे (संपर्क प्रमुख), उदय मोहिते (खजिनदार) यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश आहे.
संस्थेचे अध्यक्ष म्हणाले, व्यंगचित्रकारांच्या हक्कांसाठी आणि व्यंगचित्रकलेच्या विकासासाठी ही संस्था आता नव्या उत्साहाने काम करेल. अध्यक्षपदाची जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन.
ही नोंदणी व्यंगचित्रकारांसाठी एक मोठा टप्पा असून महाराष्ट्रासह देशभरातील व्यंगचित्रकारांना संघटित व्यासपीठ मिळाले आहे.