India news | ‘वर्षा’ निवासस्थानी केंद्रीय मंत्री आठवले यांनी गणरायाचे दर्शन घेऊन घेतला आशीर्वाद

उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई |३१ ऑगस्ट | प्रतिनिधी

(India news) राज्यातील गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू असताना राजकीय क्षेत्रातही भक्तिभावाचे दर्शन घडत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट दिली.

 

(India news) यावेळी फडणवीस यांनी आठवले यांचे पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. गणेशोत्सवाच्या मंगल वातावरणात श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आठवले यांनी भक्तिभावाने आरती केली आणि आशीर्वाद प्राप्त केला.

India news
देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते गणेशमूर्तीची भेट स्वीकारताना रामदास आठवले
(India news) गणेशमंडप आकर्षक फुलांनी सजवला होता. श्री गणरायाच्या मूर्तीसमोर पूजन-अर्चन करून आठवले यांनी महाराष्ट्रातील जनतेस सुख-समृद्धी व अखंड प्रगतीची प्रार्थना केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाची प्रतिमा भेट देत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आगमन संस्मरणीय केले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *