
मुंबई | १८ मे | प्रतिनिधी
(India news) भारतीय संविधान (१२९ वी सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४ संदर्भात गठीत करण्यात आलेल्या संसदीय संयुक्त समितीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी लोकसभा सदस्य आणि समितीचे अध्यक्ष पी.पी. चौधरी, लोकसभा सदस्य धर्मेंद्र यादव आणि राज्यसभा सदस्य घनश्याम तिवारी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
(India news) या बैठकीत समितीने महाराष्ट्र राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी, विविध राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, रिझर्व बँक ऑफ इंडिया, तसेच स्टेट बँक, युनियन बँक, एलआयसी, जीआयसी आदी वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर सल्लामसलत केली.
(India news) संविधान दुरुस्ती विधेयकाच्या अनुषंगाने समांतर निवडणुका (Simultaneous Elections) घेण्याच्या प्रस्तावामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक, प्रशासकीय आणि घटनेतील बदलांचे विविध पैलू समितीने विचारात घेतले आहेत. राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समांतर निवडणुकांमुळे संभाव्य परिणामांविषयी विशेष चर्चा झाली.
या पत्रकार परिषदेत विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या या विधेयकाच्या अनुषंगाने देशभरात विविध पातळ्यांवर सल्लामसलती व चर्चासत्रे आयोजित केली जात आहेत.
हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.