(India news) देशाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला सदिच्छा भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. याच विद्यालयातून त्यांनी आपले प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण पूर्ण केले होते. अनेक वर्षांनंतर पुन्हा या शाळेच्या प्रांगणात पाऊल ठेवताना त्यांनी आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचललेल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
(India news) या भावनिक आणि विशेष प्रसंगी मा. भूषण गवई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि आयुष्यातील यशासाठी सातत्य, मेहनत आणि प्रामाणिकपणावर भर दिला.
(India news) कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार, चिकित्सक समूहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर, सचिव डॉ. गुरूनाथ पंडित, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संचिता गावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या भेटीदरम्यान विद्यालयाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संपूर्ण परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण दिसून आले.