अहमदनगर | २६ ऑगस्ट | रयत समाचार
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर “भारतीय डाक विभागाने १ सप्टेंबर २०२५ पासून टपाल पेट्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे” असा दावा मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. मात्र, ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे भारतीय डाक विभागाने स्पष्ट केले आहे.
India Post ने आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर लिहिले आहे, ‘आमच्या लाल टपाल पेट्या कायम राहतील, त्या कुठेही हटवल्या जाणार नाहीत.’ त्यामुळे टपाल पेट्या बंद होणार असल्याचा दावा फक्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, १८५४ पासून सुरू असलेली ‘रजिस्टर पोस्ट’ सेवा मात्र ता. १ सप्टेंबर २०२५ पासून थांबणार असून ती स्पीड पोस्टमध्ये विलीन होणार आहे. यापुढे नागरिकांना सुरक्षित व जलद सेवा देण्यासाठी केवळ स्पीड पोस्टच उपलब्ध राहील.
डाक विभागाने स्पष्ट केले की, टपाल पेट्या पूर्वीप्रमाणेच नागरिकांच्या सेवेत कायम राहतील. त्यामुळे या अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले.
