नगर तालुका | प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे लक्ष्मीआई जत्रा शुक्रवारी सायंकाळी उत्साहात पाडली. जत्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळगाव माळवी ग्रामस्थांबरोबरच पंचक्रोशीतील ग्रामस्थ जत्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पिंपळगाव माळवी हे आठ हजार लोकसंख्येचे बागायती गाव असून गावात लक्ष्मी मातेचे मंदिर आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात ग्रामस्थ लक्ष्मीमाता जत्रोत्सव साजरा करतात. यानिमित्त गावात लक्ष्मीमाता कलशाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. जत्रेनिमित्त पंचक्रोशीतील पोतराज एकत्रित आले होते. मिरवणूकीनंतर सायंकाळी ग्रामस्थांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.