मुंबई | ९ जून | प्रतिनिधी
(Cultural Politics) शिवराज्याभिषेक सोहळ्याचा थाटमाटात उत्सव साजरा करत कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून ‘विधी’वत आरती केली. या कार्यक्रमाला माजी खासदार पूनम महाजन यांच्यासह अनेक शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थिती लावली.
(Cultural Politics) जगप्रसिध्द ६ जूनऐवजी ठरवून तिथीनुसार ९ जूनला शिवराज्याभिषेक साजरा करत हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवण्यासाठी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन काहीजणांकडून केले जाते. कुर्ल्यातील मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्याचे आयोजन उत्साही वातावरणात झाले.
(Cultural Politics) मंदिरात साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती, फुलांची सजावट आणि भक्तिमय वातावरणाने उपस्थित प्रत्येक शिवप्रेमी भारावून गेला. कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक सादरीकरणासोबतच ऐतिहासिक पार्श्वसंगीतही देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात महाराजांच्या दूरदृष्टी, शौर्य आणि जनतेप्रती असलेल्या सेवाभावाचे स्मरण करून, युवकांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

