Ipl

History | जॉन मेंडोंसा; राहून गेलेली मुलाखत

SubEditor | Dipak Shirasath

स्मृतिवार्ता | ६.३ | प्रभाकर ढगे

(History) इन गोवा 24×7 साठी मुलाखती घेताना मी विशिष्ट विषय वा ठराविक व्यक्ती, असे काही ठरवलेले नसते. राजकारण. समाजकारण, पर्यावरण, साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, अशा अनेक विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखती कधी दररोज वा दरदिवसाआड असायच्या. त्यासाठी विविध क्षेत्रातील बोलू शकणाऱ्या मंडळींचा सदैव शोध सुरू असायचा. तो आजही असतोच.

(History) गोव्यात केवळ हिंदूच मराठी बोलतात आणि ख्रिश्चन ही भाषा बोलू वा समजू शकत नाहीत, असे मिथक काही जणांनी जाणीवपूर्वक पसरवलेले आहे. ते कसे खोटे आहे हे सिद्ध करण्यासाठी मी मुद्दाम ख्रिश्चन विचारवंत, लेखक, राजकीय नेते, शिक्षणतज्ज्ञ, तियात्रिस्ट यांची निवड केली. यापैकी कोणीही मला मराठी येत नाही, असे म्हणाले नाही. मराठी बोलताना मी अडखळू शकतो, असे म्हणणारे देखील सफाईदारपणे बोलले. मराठीत व्यक्त होणाऱ्या अनेक ख्रिश्चन तज्ज्ञांची नावे जॉन मेंडोंसा सरांनी मला वेळोवेळी सूचवली.

(History) शिक्षण क्षेत्रातील एक तत्वचिंतक, माजी मुख्याध्यापक, शिक्षणप्रेमी जॉन मेंडोंसा यांच्याशी फोनवरून अनेकदा बोलणे झाले. पणजीला आलात की भेटा आपण आजच्या शिक्षण व्यवस्थेवर बोलू असे आमचे अनेकदा बोलणे झाले. पण तो योग काही येत नव्हता. पणजीत ४ ते ८ फेब्रुवारी २०२६ या काळात राष्ट्रीय पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याच्या आयोजनात प्रमुख पुढाकार घेतलेले तरुण भारतचे मालक संपादक किरण ठाकुर यांच्या सोबत जॉन मेंडोंसा यांची पुन्हा भेट झाली. पुस्तक महोत्सवात चारही दिवस ते किरण ठाकुर यांच्या सोबत होते. नंतर कळले की हे दोघे वर्गमित्र आहेत.

- Advertisement -
Ad image

किरण ठाकुर यांची पुस्तक महोत्सवस्थळी मुलाखत घेतली. त्यावेळी सोबत असलेल्या जॉन मेडोंसा यांच्याशी अनेक विषयावर चर्चा झाली. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यातील शैक्षणिक उपक्रमात सहभागी असलेल्या जॉन मेंडोंसा यांची ३-४ भागात मुलाखत घ्यायचे ठरले होते. मी लवकरच पणजीला येतो, असे सांगून गेलेले जॉन मेंडोंसा यांच्या आकस्मिक निधनाची धक्कादायक बातमी (४ मार्च २०२६) रोजी आली. जॉन मेंडोंसा सरांच्या राहून गेलेल्या या मुलाखतीची तीव्र सल बराच काळ सलत राहिल !
May His Soul Rest In Peace
🙏

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai

Share This Article