भिंगार | ११.४ | रयत समाचार
(History) महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित करत इ.स. १९ मार्च १८५० रोजी भिंगार येथे बिने पाटलांच्या सहकार्याने मुलींसाठी सुरू केलेली ऐतिहासिक शाळा आज अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभी आहे. ‘वाड्यातील मुलींची शाळा’ म्हणून ओळख असलेली ही वास्तू पुढे ‘सरदार वल्लभभाई पटेल कन्या शाळा’ या नावाने प्रसिद्ध झाली.

मात्र, सध्या या ऐतिहासिक शाळेच्या वास्तूमधील वर्गखोल्या ‘शाळा बंद पडल्याचे’ कारण देत अहिल्यानगर छावणी परिषदेतील काही अधिकाऱ्यांकडून भाड्याने देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. स्थानिकांच्या मते, हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासावर घाला घालणारा आहे.
(History) महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या या शाळेचा वारसा केवळ भिंगारपुरता मर्यादित नसून, तो देशातील स्त्री शिक्षणाच्या इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. त्यामुळे या वास्तूचे जतन करणे ही शासन आणि समाजाची संयुक्त जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
(History) या पार्श्वभूमीवर विकास चव्हाण तसेच भिंगार व अहिल्यानगर परिसरातील सत्यशोधक, इतिहासप्रेमी कार्यकर्त्यांनी एकत्र येत या शाळेला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याची मागणी केली आहे. “ही वास्तू वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, अन्यथा आपल्या इतिहासाचा अमूल्य ठेवा कायमचा नष्ट होईल,” असे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि इतिहासप्रेमींनी या प्रश्नावर एकत्र येत लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाने या मागणीस सक्रीय पाठिंबा दर्शविला आहे.
हे ही वाचा : महात्मा फुले समग्र वाड्मय
हे ही वाचा : सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

