Health | टाटा हॉस्पिटल सायको-अंकोलॉजिस्ट सविता गोस्वामी यांना पीएच.डी तर सुमित्रा महाजन यांनाही डी.लिट्. प्रदान

Health | टाटा हॉस्पिटल सायको-अंकोलॉजिस्ट सविता गोस्वामी यांना पीएच.डी तर सुमित्रा महाजन यांनाही डी.लिट्. प्रदान

मुंबई | २३ सप्टेंबर | रयत समाचार

(Health) जीवनात प्रत्येकाला काही टप्पे गाठावे लागतात. काही अपेक्षित, काही गरजेपोटी, तर काही टप्पे असतात असे, जे आपली सहनशीलता आणि अंतःशक्तीची खरी कसोटी पाहतात. अशाच कसोटीवर स्वतःची जिद्द सिद्ध करून टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कार्यरत सायको-अंकोलॉजिस्ट सविता गोस्वामी यांनी मानसशास्त्रातील पीएच.डी. पदवी प्राप्त केली.Health

(Health) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) महिला विद्यापीठ, मुंबईच्या ७५ व्या दीक्षान्त समारंभात नुकताच हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला. ‘कॅन्सरग्रस्त बालके आणि त्यांचे सर्वायव्हर’ या विषयावर संशोधन करून गोस्वामी यांनी ही डॉक्टरेट मिळवली.Health

(Health) कौटुंबिक जबाबदाऱ्या, हॉस्पिटलमधील व्यस्त दिनक्रम आणि संशोधनाचा प्रचंड ताण यांचा समतोल साधत हे यश मिळवणे सोपे नव्हते. मात्र जिद्दीने, चिकाटीने आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांनी हा महत्त्वाचा प्रवास पूर्ण केला. त्यांच्या या यशामुळे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील सहकारी, कॅन्सरग्रस्त मुलांचे पालक आणि समाजमन सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे.
डॉ. सविता गोस्वामी यांचे हे यश खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असून, “जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही” याची प्रखर जाणीव करून देणारे ठरले.Health
तसेच लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातील व महिलांच्या सक्षमीकरणातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी.लिट्.) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होत असेल तर त्याचे महत्त्व अधिक वाढते. त्यादृष्टीने लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे. विद्यापीठांनी ज्ञान आणि नवीन संशोधनावर अधिक भर द्यावा.
या समारंभास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच या दीक्षान्त समारंभात पदवी, पदव्युत्तर, पदविका विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून संशोधन व नवोन्मेष क्षेत्रात योगदान दिलेल्या डॉक्टरेट पदवीधारकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

Health आरोग्य महिला शिक्षण