अहमदनगर | पंकज गुंदेचा
शहरातील केशर गुलाब मंगल कार्यालय येथे आदिती ओबेराय यांच्या पुढाकारातून स्पेशल Festival राखी सेलिब्रेशन निमित्त दोन दिवसीय खाद्य आणि खरेदी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ता.२४ व २५ जुलै रोजी साजरा होणाऱ्या महोत्सवात वेगवेगळ्या ८० प्रकारचे स्टॉल असणार आहेत. कपडे, ज्वेलरी, मेकअप, फुटवेअर, फूड स्टॉलसोबत बरेचकाही स्टॉल लावण्यात येणार आहेत.
खाद्य व खरेदीचा आनंद घेण्यासाठी केशर गुलाब मंगल कार्यालयातील महोत्सवास भेट द्यावी. यामध्ये मनोरंजनाचे वेगळे कार्यक्रमही घेण्यात येणार असून महोत्सवाचे उदघाटन स्टॉलधारकांपैकी जी महिला शून्यातून वर आलेली आहे आणि आणि जिचा आदर्श इतर महिला भगिनींनी घ्यावा, अशा महिलेच्या हस्ते होणार आहे.
महोत्सवाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत ग्राहकांच्या आग्रहास्तव ठेवलेली असून महोत्सवामधील खास आकर्षण म्हणजे कोकणात मिळणारे उकडीचे मोदक. बोरकर फुड्स यांचा स्पेशल स्टॉल येथे असणार आहे. जे उकडीचे मोदक तुम्ही कोकणात खाणार ते तुम्हाला इथेही मिळतील.
महोत्सवातील स्टॉलधारक महिला होतकरू असून स्वतःचे स्किल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. अन्नपुर्णा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण महोत्सवास नक्की भेट द्यावी. महिलांना प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे. आमच्या माध्यमातून हे नेहमी अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात. जे महिलांना प्रोत्साहन देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. अधिक माहितीसाठी अदिती ओबेराय 7030437730 यांना संपर्क साधावा.
हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.