अहमदनगर | १४ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Election विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात बुधवारी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
विधानसभा Election निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ. आस्थापनांना लागू राहील.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी-कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी किंवा व्यवस्थापनाने वरील आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. याबाबत तक्रार असल्यास सहायक कामगार आयुक्त कार्यालय, मुलजी निवास, डॉ. चोभे हॉस्पिटल, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहमदनगर (दूरध्वनी क्र. ०२४१-२४५१८५२) येथे करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त रे.मु.भिसले यांनी केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.