(Education) खालापूर तालुक्यातील वावर्ले येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलमधे विज्ञान विभागाच्यावतीने ता.२८ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रक्षाळे आर.एल. यांनी डॉ. सी.व्ही. रामन यांच्या संशोधन कार्याची माहिती देऊन विज्ञान दिनाचे महत्व सांगितले.
(Education) विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक उपकरणे सादर करून प्रात्यक्षिक दाखविले. यामध्ये अंजली पिरकड, दृष्टी होला, संजना घुटे, कांचन मेंगाळ, भरत आखाडे, किशोर वाघ, विशाल शिद, गौरव वाघमारे, नियती कदम, कृष्णा भुरबुडा, दत्तात्रेय कोकरे, प्रतीक्षा दरवडा, समीक्षा वानखेडे, कल्पना अगीवले आदी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रात्यक्षिक सादर केले. पाटील व्ही.जी. यांनी विज्ञान दिनाचे महत्व आपल्या मनोगतातून सांगितले.
(Education) पवार एस.यू. आणि आडसरे एस.सी. यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दरेकर वाय.डी. यांनी सहकार्य केले. विज्ञान विभागप्रमुख पाटील व्ही.जी. यांनी नियोजन केले.