अहमदनगर | ६ सप्टेंबर | संध्या मेढे
७ वर्षाचा आदर्श कारभार, ७ टक्के लाभांश देणार !
Education Politics अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये ८,२६,८३,२५५/- इतका निव्वळ नफा झाला. काही तरतुदी वजा जाता वार्षिक सभेनंतर सभासदांना ७ टक्के प्रमाणे लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बाळु सरोदे व उपाध्यक्ष रमेश गोरे यांनी दिली. शिक्षक बँक वार्षिक सभेपुर्वी कै. दादासाहेब दोंदे स्मारक मंदिर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रविवारी ता.८ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
अहवाल सालात बँकेच्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली. सध्या कर्जाचा व्याजदर ८.४० व ७.९० टक्के असून एवढ्या कमी व्याजदारामध्ये कर्ज वितरण करणारी अ.जि.प्रा.शिक्षक सहकारी ही राज्यातील एकमेव बँक आहे. गुरुमाऊली मंडळ सत्तेत आल्यापासून झालेले निर्णय फक्त आणि फक्त सभासद हित डोळ्यासमोर ठेवून घेतलेले आहेत. मागिल २६ वर्षात झाला नाही असा आदर्श कारभार गेल्या ७ वर्षामध्ये संचालक मंडळाने केला आहे.
सभासदांना ४१ लाख रूपये कर्ज वितरण करणारी शिक्षक बँक ही एकमेव बँक आहे. अहवाल सालामध्ये बँकेच्या ठेवीमध्ये १६३ कोटी रूपयांची वाढ झालेली आहे. मार्च अखेर बँकेच्या ठेवी १४५९ कोटी आहेत. हा सभासद व ठेवीदार यांनी संचालक मंडळावर दाखविलेला विश्वास आहे.
सभासद कल्याणनिधीमधून सभासद व त्यांच्या पाल्यांना पारितोषिके, रू. २५ हजारापर्यंत वैद्यकीय मदत व रू.३ हजार अंत्यसेवा मदत दिली जाते. सभासद कर्ज निवारण निधीमधून मयत सभासदांचे रू.४१ लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाते. तसेच कुटुंबआधार निधीमधून मयत सभासद, कर्मचारी यांचे वारसास रू.१५ लाख आर्थिक मदत व सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदाना बँके तर्फे रू.११ हजार कृतज्ञता निधी दिला जातो. सभासदांना अशा प्रकारची भरीव मदत दिली जाते. आगामी काळामध्ये बँकेच्या कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा सचालक मंडळाचा मानस आहे, असे उपाध्यक्ष रमेश गोरे यांनी सांगितले.
गुरुमाऊली मंडळाच्या काळामध्ये सभासदांना कर्ज व्याजदरात कपात, लाभास आणि कायम ठेवीवरील व्याजामध्ये जास्तीत जास्त वाढ करून सभासदांचा भरीव फायदा संचालक मंडळाने केला आहे. संचालक मंडळाने रविवारी ता.८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासद कर्ज निवारण निधी व रिझर्व्ह बँकेच्या सुचनेप्रमाणे पोटनियम दुरूस्ती सुचविलेली आहे. तसेच संगमनेर शाखेसाठी नविन व जामखेड शाखा कार्यालयासाठी स्वमालकीची जागा घेणेबाबत शिफारस मंजूरीसाठी ठेवली आहे, तसेच सभासद कर्ज निवारण निधी, मयत सभासदाचे कर्ज बार करण्यासाठी निधी कमी पडत असल्याने कुटुंबआधार निधीमधून रू. १ कोटी ७५ लाख सभासद कर्ज निवारण निधीमध्ये वर्ग करण्यास मंजूरी मिळण्यासाठी संचालक मंडळाने शिफारस केली आहे. ऑक्टोबर २०२२ पासुन गुरुमाऊली मंडळ २०१५ चे मार्गदर्शनाखाली विद्यमान संचालक मंडळ बँकेच्या सत्तेत असून सभासद हिताचे निर्णय घेऊन कर्ज व्याजदर ७.९० व ८.४० टक्के तर सभासद कायम ठेवीवर ७ टक्के व्याजदर देऊन १.४० चे फरकाने कारभार केलेला आहे. यामध्ये बँकेचे आजी माजी पदाधिकारी, सभासद, कर्मचारी यांचे मोठे योगदान असून १०५ वर्षाचा महाकाय वटवृक्ष म्हणजे प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या बँकेची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी होत आहे, त्याचा अहवाल समोर ठेवलेला आहे, असे ते यावेळी म्हणाले.
गेल्या काही वर्षामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये होणाऱ्या गोंधळाची परंपरा खंडीत केली आहे. पुर्वी पाच मिनीटात संपणारी सभा आम्ही नऊ नऊ तास चालविली आहे. उद्याची सभा देखील आम्ही दिर्घकाळ चालविण्याचा संकल्प केला आहे. सभसदांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी संचालक मंडळाची आहे. सभासदांनी आपले प्रश्न मांडावेत आणि त्यावर साधक बाधक चर्चा होऊन वार्षिक सभेमध्ये योग्य ते निर्णय व्हावेत यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे अवाहन संचालक मंडळाने केले.
यावेळी शिक्षक नेते सुरेश निवडूंगे, राजकुमार साळवे, विद्युल्लता आढाव, साहेबराव अनाप, राजू राहाणे, किसन खेमनर, अर्जुन शिरसाठ, बाबा खरात, आर.टी. साबळे, बाळासाहेब मुखेकर, राम वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेस संचालक चेअरमन बाळु सरोदे, व्हा. चेअरमन रमेश गोरे, संचालक कैलास सारोक्ते, आण्णासाहेब आभाळे, भाऊराव राहिंज, शशिकांत जेजुरकर, योगेश वाघमारे, माणिक कदम, सुर्यकांत काळे, संतोषकुमार राऊत, ज्ञानेश्वर शिरसाट, शिवाजी कराड, बाळासाहेब तापकिर, रामेश्वर चोपडे, संदीप मोटे, कारभारी बाबर, गोरक्षनाथ विटनोर, महेंद्र भणभणे, कल्याण लवाडे, श्रीम. सरस्वती घुले, निर्गुणा बांगर, विठठल फुंदे, दिनेश खोसे उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.