भिंगार | १५ ऑक्टोबर | विष्णू उदे
Education मानवाच्या शालेय जीवनात वाचन हा मूळ संस्कार असून त्यातून माणूस घडतो म्हणून प्रत्येकाने वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते, लोकप्रिय कवी, साहित्यिक सुभाष सोनवणे यांनी केले. भिंगार येथील श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूलमधे डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणादिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रमोद तोरणे तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकगीतकार अरुण आहेर, मुख्याध्यापक नारायण अनभुले उपस्थित होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक संपत मुठे यांनी केले.
कवी सोनवणे यांनी वाचनासाठी प्रत्येकाने वेळ काढला पाहिजे. वाचन सध्याच्या काळात गरजेचे असून बालकांनी छोटी छोटी पुस्तके वाचली पाहिजेत, असे आग्रही आवाहन केले.
प्रारंभी इंग्रजी भाषा साहित्य प्रदर्शन व पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकशाहीर अरुण आहेर यांनी मुलांना व्यायाम, खेळ आणि अभ्यास याविषयी माहिती सविस्तर माहिती दिली तसेच मोबाईलपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी प्राजक्त रासकर व अनुष्का गर्जे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन आकांक्षा पडदुणे व संदीप आस्वर यांनी तर आभार गणपत करवते यांनी मानले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा