Education | ‘आयएमएस’चे प्रा. विजय शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शिक्षा भूषण’ पुरस्काराने गौरव

उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | ४ जून | प्रतिनिधी

(Education) ‘जागृती ड्रीम्स ऑफ यंग माइंड्स फाउंडेशन’ व ‘इस्रो’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिशन राष्ट्र शिक्षा भूषण पुरस्कार २०२५’ सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील प्रा. विजय शिंदे यांना ‘महाराष्ट्र शिक्षा भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा कार्यक्रम नुकताच मुंबई येथे पार पडला.

 

(Education) पुरस्काराचे वितरण चेतना पब्लिकेशनचे विभागीय संचालक राज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजय चौबे, स्नेहालय शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा मुंगी, तसेच विवेकानंद शाळेच्या कांचन पापडेजा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

 

(Education) प्रा. विजय शिंदे हे पारगाव येथील डॉ. शरद कोलते इंग्लिश मिडियम स्कूलमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करत असून, आरोग्य शिबीर, महिला व युवकांसाठी उद्योजकता मार्गदर्शन, वृक्षारोपण, कौशल्य विकास अशा विविध उपक्रमांमधून समाजोपयोगी कार्य करत आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

 

लवकरच शाळेमध्ये ‘वैशाली कोलते कौशल्य विकास केंद्रा’ची स्थापना होणार असून त्याद्वारे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच शाळेसाठी डॉ. नितीन कोलते यांनी चिंचा फोडणी मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यातून होणारे उत्पन्न शाळेच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे.
प्रा. विजय शिंदे हे भा.पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या आयएमएस महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात सक्रीय असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या यशाबद्दल डॉ. एम.बी. मेहता (संस्थेचे संचालक), डॉ. विक्रम बार्नबस (उपसंचालक), डॉ. प्रोनोती तेलोरे (विभागप्रमुख), डॉ. शरद कोलते, शिवाजी टेमकर (निवृत्त महसूल अधिकारी), वसंत दिवटे, उद्योजक शहाजी मोरे, तसेच परिसरातील नागरिक व कुटुंबीयांनी प्रा. शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *