नगर तालुका | १९ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(Education) तालुक्यातील सारोळाबद्दी येथील माऊंट सिनाय कॉन्व्हेंट स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर महाविद्यालय भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. शरद बोरुडे उपस्थित होते.
(Education) प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ. बोरुडे व मुख्याध्यापिका जयश्री खरात यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ऋतुजा म्हस्के, हुमीर शेख, सोहम म्हस्के व सार्थक काळे या विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी इयत्ता सातवीच्याच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली. यामध्ये सृष्टी पोकळे, राहुल कला, अर्षद शेख व समीर खान यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
(Education) आज सुमारे चार दशकानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले विचार जीवनातील प्रत्येक टप्प्यात उपयुक्त ठरत आहेत, असे प्रतिपादन डॉ. शरद बोरूडे यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका नेहा केदारे, वर्ग शिक्षिका रेणुका बानिया, उज्वला पंडित, अश्विनी कोरडे, अर्चना केदार व किशोर उबाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी कल्हापुरे व तनवी काळे यांनी केले.
हे ही वाचा : Social | नैतिकता : समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक – संजय सोनवणी