Education | एआय युगात कायदेशीर करिअरचे नवे वळण; मॉडर्न लॉ कॉलेजमध्ये डॉ. अशोक येंडे यांचे प्रेरणादायी व्याख्यान

उपसंपादक | दिपक शिरसाठ

पुणे | २५.१२ | रयत समाचार

(Education) येथीस पी.ई.एस. मॉडर्न लॉ कॉलेज मधे ‘एआय क्रांतीच्या युगात कायदेशीर करिअरचे नव्याने परिभाषण’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अओलक येंडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.Education

(Education) आपल्या भाषणात डॉ. येंडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय कायदेशीर शिक्षण, वकिली व्यवसाय, न्यायप्रक्रिया तसेच कायदेशीर सल्लागार क्षेत्रात कशा प्रकारे आमूलाग्र बदल घडवून आणत आहे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. भविष्यातील कायदेशीर व्यावसायिक संधी, नवीन कौशल्यांची गरज, तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचे महत्त्व आणि नवकल्पनांची भूमिका यावर त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.Education

(Education) एआयच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता नव्या तंत्रज्ञानाचे आकलन करून स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. बदलत्या कायदेशीर परिसंस्थेत यशस्वी होण्यासाठी कौशल्यविकास, संशोधनवृत्ती आणि नवोन्मेष यांचा स्वीकार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनन्या बिबवे, महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि प्राध्यापकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांकडून या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

TAGGED:
Share This Article