अहमदनगर | २८ जुलै | प्रतिनिधी
(Education) सध्या अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्रात व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी दाखल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे. यावर तोडगा काढत विद्यार्थ्यांना किमान सहा महिन्यांची मुदत देऊन दाखल्याशिवाय प्रवेश देण्यात यावा, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण महासंचालक आणि शासनाच्या संबंधित विभागांकडे केली आहे.
(Education) विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, कृषी, तंत्रनिकेतन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी जात पडताळणी दाखल्याची सक्ती केली जात आहे. मात्र, हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थी संबंधित कार्यालयात रांगेत बसून वेळ घालवत आहेत आणि तरीही दाखला वेळेत मिळत नाही. याउलट महाविद्यालयांकडून दाखला नसेल तर पूर्ण फी भरा, अशा प्रकारची तोंडी सक्ती केली जात आहे. ही मनमानी वागणूक गंभीर असून ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे.
(Education) पूर्वीच्या शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात अशी घोषणा केली होती की, विद्यार्थ्यांना जात पडताळणी दाखला सादर करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत दिली जाईल, आणि अर्जाची पोचपावती दिल्यास प्रवेश दिला जाईल. मात्र अद्याप त्याचे कोणतेही परिपत्रक निघालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत.
सध्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हे परिपत्रक तातडीने काढावे आणि सर्व महाविद्यालयांना स्पष्ट आदेश द्यावेत. तसेच, जातपडताळणी समित्यांना एका महिन्याच्या आत प्रमाणपत्र देण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशीही मागणी श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यतामान्यता

