Education | एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन मुट कोर्ट स्पर्धेचा दिमाखदार समारोप

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dioak Shirasath

पुणे | १९.२ | रयत समाचार

(Education) एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय, मोरवाडी, पिंपरी येथे श्रीमती सुभद्रा भोसले ५ वी राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाइन अभिरूप न्यायालय (मुट कोर्ट) स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशभरातील ३२ विधी महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

(Education) विधी शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये वकिली कौशल्य, लीगल रिसर्च, न्यायालयीन युक्तिवाद व वादविवाद क्षमता विकसित करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.

(Education) स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहीणी जगताप यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुणा फारसवाणी (माजी मुख्य न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, ठाणे) उपस्थित होत्या.
पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रो.डॉ. एम.एच. हिराणी (माजी विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), ॲड. वैभव कुलकर्णी (अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय), डॉ. प्रियांका अग्रहारी (प्रिन्सीपल, एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूल) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्पर्धेत आय.एल.एस. विधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले, तर तेलंगनाच्या एस.व्ही.के.एम.एन.एम.आय.एम.एस. स्कूल ऑफ लॉ संघाने उपविजेतेपद मिळवले. विशेष पारितोषिकांमध्ये बेस्ट मेमोरियल- किशनचंद चेलाराम लॉ कॉलेज, मुंबई. बेस्ट ॲडव्होकेट- आद्या कुमार (गुरु गोविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ, नवी दिल्ली) यांना प्रदान करण्यात आले. विजेत्या संघास ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून ॲड. अर्पिता गोस्वामी यांनी जबाबदारी पार पाडली. प्राचार्या डॉ. रोहीणी जगताप यांनी आभार प्रदर्शन केले. स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या मुट कोर्ट सोसायटी मार्फत करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading