अहमदनगर | ८ फेब्रुवारी | विजय मते
(education) येथील वसंत टेकडी जवळील डॉ. ना.ज. पाअुलबुधे महाविद्यालयात चार दिवस इंडक्शन प्रोग्राम संपन्न झाला. व्याख्यानमालेचे उद्घाटन सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासक डॉ.श्रद्धा पाअुलबुधे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, बी व डी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, शैक्षणिक संकुलाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद उपस्थित होते.
(education) चार दिवस झालेल्या या व्याख्यानमालेमध्ये शैक्षणिक संकुलाच्या प्रमुख डॉ.रेखाराणी खुराणा यांनी कॉलेजचे नियम, पॉलिसी याबाबत माहिती देऊन आदर्श विद्यार्थी होण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉ.वेणू कोला यांनी बी.फार्मसी अकॅडमीची ओळख करून देत नायपर परीक्षा कशाप्रकारे उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना फार्मसीचे महत्व विशद केले.
(education) बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. श्याम पंगा यांनी विद्यार्थ्यांना कसे शिकायचे आणि कसे शिकावे यामधील फरक स्पष्ट करून जर तुम्ही नम्र असाल तर तुमचं कोणीही काही बिघडू शकत नाही. त्यासाठी नम्रता गुण अंगी बाळगा असे आवाहन केले.
(education) डॉ. सुचित्रा डावरे यांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या माणसांची कशाप्रकारे वागावे व कसे कम्युनिकेशन ठेवावे याबाबत माहिती देऊन वाचन व लिखाण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. चार दिवस झालेल्या या इंडक्शन प्रोग्रामवर परीक्षा घेण्यात आली. यामध्ये प्रथम कल्याणी साठे, द्वितीय आदित्य साठे, प्रतीक्षा क्षीरसागर तर तृतीय आशुतोष कोल्हे यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. फार्मासिटच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सामूहिक शपथ घेऊन या व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली. श्रद्धा मुंदडा यांनी आभार मानले.
हे हि वाचा :History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर