अहमदनगर |८ फेब्रुवारी| प्रतिनिधी
(press) भा.पा.हिवाळे शिक्षण संस्थेचे सीएसआरडी ॲण्ड आयएसडब्ल्यूआर संस्थेच्या बीजेएमसी म्हणजेच पत्रकारिता विद्यार्थ्यांनी लोकमत मिडीया हाऊसला अभ्यास भेट दिली. यावेळी अहमदनगर लोकमतचे प्रमुख सुधीर लंके यांनी सर्वांचे स्वागत करून सविस्तर माहिती दिली. विविध विभागांमधे पत्रकारीता संदर्भात चालणारे कामकाज याची प्रत्यक्ष माहिती दाखविली.
(press) संस्थेचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून ज्ञान मिळावे यासाठी विविध मिडीया हाऊसला कामकाजाच्या वेळी अभ्यास भेटी दिल्या जातात. यावेळी विभाग प्रमुख सायली तोरणे यांनी मिडीया संदर्भातील विविध प्रश्नांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही चौकसपणे हे सर्व कामकाज पहिल्यांदा पाहिले.
सुधीर लंके यांनी स्वागत करून सर्व कार्यरत पत्रकार, उपसंपादक, जाहीरात प्रतिनिधी, इंजिनिअरिंग विभाग यांचा कामकाजाचा परिचय करून तिला तसेच फिल्डवरून प्रत्यक्ष बातमी कशी येते आणि तिच्यावर कायकाय संस्कार होतात तसेच ती फायनल प्रसिद्धीसाठी कशी जाते आणि थेट सकाळी वाचकांच्या हातात कशी पडते हा सर्व प्रवास समजून सांगितला.
यावेळी लोकमतचे सुदाम देशमुख, आण्णा नवथर, अरूण नवथर, चंद्रकांत शेळके, डिक्कर आदींसह सर्व पत्रकार, उपसंपादक, इंजिनिअर, प्रुफरिडर यांचा परिचय करून दिला. या सर्वांनी पत्रकारिता विद्यार्थ्यांना यशस्वी करियरसाठी शुभेच्छा दिल्या. या अभ्यास भेटीमधे पंकज गुंदेचा, दिपक शिरसाठ, मरयम सय्यद, एस्थर, इमान्यूएल, जोस, रसिका चावला, नवनाथ मगर, भैरवनाथ वाकळे हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर