Divyang Conference: दिव्यांग कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या हक्कांसाठी निर्णायक बैठक; 14 डिसेंबरला अहिल्यानगरात राज्यस्तरीय मार्गदर्शन

उपस्थित राहण्याचे संतोष सरवदे यांचे आवाहन

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते
  • Divyang Conference

अहमदनगर | रयत समाचार

Divyang Conference: महाराष्ट्र शासनमान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेतर्फे दिव्यांग कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या हक्क आणि समस्या यावर चर्चा करण्यासाठीची महत्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील दिव्यांग कार्यालयात होणार असून राज्यातील शासकीय, निमशासकीय, अनुदानीत आणि विना-अनुदानीत विभागांत कार्यरत अ ते ड संवर्गातील सर्व दिव्यांग (Divyang )कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत दिव्यांग (Divyang)कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या कार्यस्थळी उद्भवणाऱ्या अडचणी, विविध विभागीय समस्या तसेच त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होणार आहे. या सोबतच संघटनेची नवीन कार्यकारिणी निवड देखील केली जाणार आहे.

बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेचे: संस्थापक अध्यक्ष दिगंबर घाडगे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनावणे, राज्य कोषाध्यक्ष संतोष सरवदे, इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुके, नगरपरिषद, नगरपालिका तसेच विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत दिव्यांग कर्मचारी-अधिकाऱ्यांना संघटनेत सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बैठकीस उपस्थित राहताना युडीआयडी कार्ड आणि त्रिसदस्यीय ऑनलाईन प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रति सोबत आणावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष सरवदे, साहेबराव अनाप, पोपट धामणे, जयकिसन वाघ पाटील, संदीप आदमने, बाळासाहेब उगले, राजेंद्र औटी, बाळासाहेब चव्हाण, राजीव शिंदे, बळीराम चव्हाण, भारत तोडमल, रोहिणी लगड, ज्योती तवले आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.

हे हि वाचा: Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

 

Share This Article