Cultural Politics | ‘एक मीम मराठीसाठी’ स्पर्धा : मराठी भाषा आणि अभिमानासाठी अनोखी संधी !

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

 

पुणे | २६ जून | प्रतिनिधी

(Cultural Politics) मराठी अभ्यास केंद्र आणि इंडी जर्नल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक मीम मराठीसाठी’ ही आगळीवेगळी स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. ‘#मराठीकारण’ या हॅशटॅगखाली आयोजित ही स्पर्धा, मराठी भाषेबाबतचा अभिमान आणि भाषाप्रेम सर्जनशीलतेच्या माध्यमातून दाखवण्याची उत्तम संधी आहे.

(Cultural Politics) स्पर्धेचा उद्देश महाराष्ट्रात मराठीसाठी जागृती निर्माण करणे आणि तिच्या वापराबाबत जागरुकता वाढवणे हा आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपले विनोदी, विचारप्रवर्तक किंवा समकालीन मीम तयार करून ‘#मराठीकारण’ या हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट करायचे आहे. पोस्टमध्ये मराठी अभ्यास केंद्र आणि इंडी जर्नल यांना टॅग करणे आवश्यक आहे.

बक्षिसे : पहिले बक्षीस – ₹3000, दुसरे बक्षीस – ₹2000, तिसरे बक्षीस – ₹1000 तसेच निवडक मीमला ₹500 चे प्रोत्साहनपर बक्षीसदेखील मिळणार आहे.
स्पर्धेची अंतिम तारीख : सहभागी होण्यासाठी २६ जूनपासून ३ जुलै २०२५ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
स्पर्धेचे नियम : १. मीम ओरिजिनल असावा; दुसऱ्याचे मीम कॉपी केलेले आढळल्यास स्पर्धेतून वगळले जाईल. २. मीममध्ये मराठी वापरणे आवश्यक आहे. ३. सामाजिक सौजन्य आणि संवेदनशीलता पाळणे गरजेचे आहे. ४. निवडलेले मीम इंडी जर्नल व मराठी अभ्यास केंद्रच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जातील.
अधिक माहितीसाठी : फेसबुक: Indie Journal / मराठी अभ्यास केंद्र. इंस्टाग्राम व ट्विटर : @indiejmag
(Cultural Politics) आपल्या भाषेच्या प्रेमासाठी आणि सर्जनशीलतेसाठी हे एक उत्तम मंच आहे. तर, तुमचे विचार आणि भावना मीमच्या रूपात मांडण्यासाठी सज्ज व्हा : ‘एक मीम मराठीसाठी’

 

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *