मुंबई | १२.६ | रयत समाचार
(Cultural Politics) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने त्याच्या सोसायटी परिसरात मारण्यात आलेल्या व्हाईट पट्ट्यांबाबत नाराजी व्यक्त करत केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला. या पोस्टमध्ये ‘जैन जिहाद’ असा उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यावरून जैन समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
(Cultural Politics) या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक प्रवीण छेडा आणि जैन समाजाच्या प्रतिनिधींनी पुर्व २ चे पोलीस उपायुक्त यांची भेट घेत वेदपाठक यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
(Cultural Politics) संबंधित पोस्टमधील वक्तव्य आक्षेपार्ह असून त्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.
तक्रारदारांच्या मते, सोशल मीडियावर मोठा प्रभाव असलेल्या व्यक्तींनी जबाबदारीने वक्तव्य करणे अपेक्षित असताना अशा प्रकारची भाषा समाजात गैरसमज आणि तणाव निर्माण करू शकते. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
हे ही वाचा : Literature | प्राचीन मराठी भाषेतील जैनांच्या योगदानाचा वाचनीय धांडोळा – डॉ. महावीर अक्कोळे
दरम्यान, या प्रकरणामुळे सोशल मीडियावरही तीव्र चर्चा सुरू झाली असून प्रसाद वेदपाठकच्या भूमिकेबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांकडून या तक्रारीची पडताळणी करण्यात येत असून पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
या वादामुळे प्रसाद वेदपाठकच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



