कोल्हापूर | १६ मे | प्रतिनिधी
(Cultural politics) ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार सतेज पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आशीर्वाद आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने आम्हा सर्वांना सकारात्मक ऊर्जा व आध्यात्मिक आनंद मिळाला. या भेटीत अनेक सामाजिक, आध्यात्मिक आणि साहित्यिक विषयावर महाराजांनी दिलखुलास संवाद साधला, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.
(Cultural politics) यावेळी इंदुरीकर महाराजांनी पद्मश्री डी. वाय. पाटील दादांची आवर्जून भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधून सदिच्छा व्यक्त केल्या. ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाई यांच्या जिवनावरिल ‘मोघल मर्दिनी ताराबाई’ हे पुस्तक महाराजांना भेट दिले तर डी.वाय. पाटील कुटुंबियांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आई शांतादेवी डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, मंजुश्री पवार आदी उपस्थित होते.
हे ही वाचा : Social | नैतिकता : समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक – संजय सोनवणी