नगर तालुका | २ नोव्हेबर | प्रतिनिधी
Cultural Politics साडेआठशे वर्षानंतर श्रीराम अयोध्योत आल्याचे औचित्य साधत हिवरे बाजारमध्ये दीपावलीच्या पावनपर्वात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ८५० दिव्यांचा दीपोत्सव पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांनी प्रथम दीपोत्सव साजरा केला. असा दीपोत्सव प्रत्येक वर्षी साजरा करण्याचा यावेळी निर्धार केला.
अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रत्येक कुटुंबातून १ दिवा (पणती), प्रत्येक संस्थेची एक पणती व सर्व मंदिराचा एक दिवा, लोकसहभागाची १० मिनिटांच्या दिव्यांच्या प्रकाशात मौन करून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, जलस्त्रोतात दिवे सोडून पूजन “दरवर्षी जलस्त्रोत भरलेले राहू दे आणि शेती समृद्ध होऊ दे” यासाठी जलदेवतेची आराधना. अशा ३ तत्वांवर प्रत्येक वर्षी दीपावलीच्या पूर्वसंध्येला सर्व ग्रामस्थ, आप्तेष्ट एकत्र येऊन दीपोत्सव साजरा करणार आहेत. Cultural Politics
८५० वर्षानंतर पुन्हा श्रीराम अयोध्येत आले, त्यानिमित्ताने ८५० दिवे प्रज्वलित करण्यात आले. ता. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास विशेष निमंत्रित म्हणून पद्मश्री पोपट पवार भव्यदिव्य सोहळ्यास उपस्थित राहिले. श्रीरामलल्लाची मूर्ती घडविताना काही अंश जगातील ३०० भाग्यवंताना पाठविले होते. त्याचाच एक शिलांश पोपट पवारांमुळे हिवरे बाजारला मिळाला. मोठ्या धूमधडाक्यात ग्रामस्थांनी रामनवमीच्या मुहर्तावर अखंड हरीनाम सप्ताह निमित्ताने शिलांशाची प्रतिष्ठापना गावातील श्रीराममंदिरामध्ये केली.
१४ वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येत आले, त्यावेळेस अयोध्या वासियांनी दिप प्रज्वलित करून श्रीरामांचे स्वागत केले, अशी वंद्यता आहे. तेव्हा अयोध्येत दिवाळी साजरी केली आणि तो सनातन धर्मातील अंधकारातून प्रकाशाकडे जाणारा दीपावली उत्सव देश विदेशी भारतीय मोठ्या आनंदाने साजरा करतात. म्हणून अयोध्या येथे साजरा करण्यात येणारा दीपोत्सव अंशरूपाने हिवरे बाजारमध्ये साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
रामराज्यात गावे स्वावलंबी, समाज निरोगी व आनंदी होता. जातिधर्मात कुठलाही भेदभाव नव्हता. राजकारणी हिंदू-मुस्लीम, जातीपातींत झगडे लावत नव्हते. शेतजमिनी विकत घेण्यावर कोणतेही बंधन नव्हते. त्या विचारांवर हिवरे बाजारमध्ये कामे झाली.
गेली ३५ वर्षात ग्रामस्थांनी लोकसहभागातून श्रमदान, प्रामाणिकपणे सहकार्य करणारे प्रशासकीय अधिकारी, ‘निर्भिड’ पत्रकार, गुणवत्तादायी कामे करणारे ठेकेदार या सर्वांनी दिलेले प्रामाणिक योगदान म्हणून स्वावलंबी गाव उभे राहिले. गेल्या अनेक पिढ्यांचे पुण्य फलित झाले म्हणून दरवर्षी हिवरे बाजारमध्ये दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
यावेळी सरपंच विमलताई ठाणगे, वि.का.से.सो. चेअरमन छबूराव ठाणगे, व्हा.चेअरमन रामभाऊ चत्तर, रोहिदास पादीर, बाबासाहेब गुंजाळ, तरुण मंडळ, महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.