कोल्हापूर | १८ मार्च | प्रतिनिधी
(Crime) शिवचरित्र इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरुन धमकी व छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर याला कोर्टाने मोठा धक्का दिला. कोल्हापूर सेशन कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. सेशन कोर्टात या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती. इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे, सरकारी वकील आणि प्रशांत कोरटकर अशा तीनही पक्षकारांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला. कोर्टाने तीनही वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला. अखेर कोल्हापूर सेशन कोर्टाने आज याबाबत निकाल सुनावला. हा निकाल शिवद्रोही कोरटकर याला मोठा धक्का देणारा आहे.
(Crime) रा.स्व. संघ परिवाराचा लाडका कोरटकर गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार असून तो पोलिसांना सापडत नाही. त्याने आपला मोबाईल पोलिसांकडे जमा केला. परंतु तो स्वत: पोलिसांच्या हाती लागत नाही. त्याने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे कोर्टाकडून त्याला दोन वेळा अंतरिम जामीन मिळाला. पण आता त्याला कोर्टाने मोठा धक्का देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आता त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस आता कोरटकरला कधी ताब्यात घेतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

