पुणे | १० मे | प्रतिनिधी
(Crime) येथील महानगरपालिकेतील दोन अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एक घोटाळा समोर आला आहे. महानगरपालिकेत महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे १०० सुरक्षारक्षक कंत्राटी स्वरूपात काम करतात. हे सुरक्षारक्षक २६ दिवस काम करीत असले, तरी ‘ओव्हरटाइम’ दाखवून त्यांचा ४० दिवसांचा पगार काढला जात असल्याचे समोर आले. यावरूनच दोन अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच वादावादी होऊन, किरकोळ हाणामारीही झाल्याच्या घटनेची पालिकेत जोरदार चर्चा रंगली आहे.
(Crime) अतिक्रणांविरोधातील कारवाईत महानगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांचे काम प्रभावी नसल्याने, पालिकेने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे शंभर सुरक्षारक्षक कंत्राटी पद्धतीने घेतले. सुरक्षा विभागाकडे यातील ३० सुरक्षारक्षक हस्तांतरित करून ते महानगरपालिका मुख्य इमारत, आयुक्त कार्यालय, राजीव गांधी प्राणी संग्रहालय आदी ठिकाणी तैनात केले.
महानगरपालिका तपास करणार का ?
(Crime) दोन अधिकाऱ्यांच्या भांडणात पालिकेतील सुरक्षारक्षकांच्या वेतनातील घोटाळा समोर आला. याशिवाय प्रत्यक्षात पाच बंदुकधारी सुरक्षा रक्षकांचे वेतन दिले जात असताना, केवळ एकच बंदुकधारी रक्षक असल्याचे आणि बंदूक सांभाळण्यासाठी आणखी तीन सुरक्षा रक्षक नेमल्याचाही दावा केला जात आहे. महापालिका या घोटाळ्याचा तपास करणार का, आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
