नगर तालुका | १५ जुलै | प्रतिनिधी
(Crime) तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे बिडवे कुटुंबाच्या शेतीच्या कायदेशीर रस्त्यावर बळजबरीने अडथळा निर्माण करून महिलांवर मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
(Crime) बिडवे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा वापर करत असून त्यासंबंधीचे कायदेशीर दस्तऐवज, ७/१२ उतारे व महसूल नकाशे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. मात्र काही शेजाऱ्यांनी या रस्त्यावर अडथळा निर्माण करत महिलांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली व जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या.
(Crime) या झटापटीत कौस्तुभ बिडवे यांच्या आई व पत्नी यांच्यावर हल्ला झाला, तर दोन वर्षांच्या मुलालाही धोक्याची परिस्थिती निर्माण झाली. कौस्तुभ हे सध्या केंद्रीय सुरक्षा दलात कार्यरत असून त्यांच्या अनुपस्थितीत हा हल्ला झाला.
