मुंबई | २४.१० | रयत समाचार
दिवंगत डॉ. संपदा मुंढे यांची आत्महत्या नसून ती एकप्रकारे ‘हत्या’च असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. कॉ. सुभाष लांडे यांनी केला आहे. डॉ. संपदा यांना सतत शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले होते, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप लांडे यांनी केला.
या प्रकरणात आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने डॉ. संपदा यांच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचे उघड झाले आहे, तसेच एका खासदाराचे नावही या प्रकरणात समोर येत असल्याने हा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे बिघडली आहे. महिलांवरील अत्याचार थांबत नाहीत, आणि जबाबदार मंत्र्यांकडून निष्क्रियता दिसते. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी ॲड. लांडे यांनी केली.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
