(Crime) अहिल्याबाईंच्या नावाने असलेल्या महानगरपालिकेत झालेल्या ७५६ रस्त्यांच्या कामांत ३४० ते ८०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. या घोटाळ्याला राजकीय व प्रशासकीय संरक्षण मिळाल्याचा संशय व्यक्त करत, राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र यांना पत्र लिहून सर्वस्वी चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
(Crime) राऊत यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, २०१६ ते २०२० या चार वर्षांत अहिल्यानगर शहरात केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून रस्त्यांचे काम दाखवले गेले, पण अनेक रस्ते प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. या प्रकारातून कागदोपत्री कामे दाखवून कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा संशय आहे.
(Crime) त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, महापालिकेवर सध्या प्रशासक कार्यरत असले तरी अधिकारी-ठेकेदार व राजकीय मंडळी मिळून लोकांचा पैसा लुटत आहेत, त्यामुळे शहरात मूलभूत सुविधा रस्ते, आरोग्य, पाणी यांचाही अभाव जाणवतो आहे.
५ जून २०२३ रोजी पहिला तक्रारीचा अहवाल सादर करण्यात आला होता, तसेच विविध शासकीय यंत्रणांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. तरीही अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर स्वरूपात उच्चस्तरीय चौकशी व्हावी, तसेच दोषींवर मोक्का/एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी केली आहे.