Crime | कॉन्सर्टमधील ड्रग्जचा कहर; दोन तरुणांचा मृत्यू; रोहित पवारांचा सरकारला इशारा

SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १४.४ | रयत समाचार

(Crime) मुंबईतील एका कॉन्सर्टदरम्यान ड्रग्ज सेवनामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, राज्यात वाढलेल्या ड्रग्जच्या साम्राज्याचे हे ताजे उदाहरण असल्याची तीव्र प्रतिक्रिया कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

(Crime) महाविद्यालयीन तरुणांना लक्ष्य करून ड्रग्ज विक्रीचे जाळे वेगाने पसरत असून, नशाखोरीचे प्रकार चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला ही परिस्थिती अजिबात शोभणारी नाही, असेही ते म्हणाले.

(Crime) पवार पुढे म्हणाले, केवळ मुंबईपुरतेच नव्हे तर राज्यातील लहानमोठ्या शहरांमध्येही ड्रग्ज सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकत आहे. अशा घटनांवर फक्त वरवरची कारवाई करून मलमपट्टी करण्याऐवजी, ड्रग्जचा हा रोग मुळातून नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर आणि व्यापक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देत ठोस कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading