Business | स्वतःचा व्यवसायच खरी आर्थिक क्रांती; कर्जतमध्ये ‘शिवशंभू’ फोटोशॉप व सोशल मीडिया डिझाईन सेंटरचा शुभारंभ

SubEditor | Dipak Shirasath

कर्जत | ५.३ | रयत समाचार

(Business) बहुजन समाजातील युवकांनी कोणताही व्यवसाय कमीपणा न मानता मेहनतीने आणि आत्मविश्वासाने करावा, तरच कुटुंबाची खरी आर्थिक क्रांती घडू शकते, असा मोलाचा संदेश संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड हे सातत्याने युवकांना देत असतात. हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत कोळवडी गावातील कष्टाळू युवक सचिन थोरात पाटील यांनी कर्जत शहरात नव्या व्यवसायाची सुरुवात केली आहे.

(Business) सचिन थोरात पाटील हे गेली अनेक वर्षे फोटोग्राफी क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि कौशल्याने कार्य करत आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आता ‘शिवशंभू फोटोशॉप व सोशल मीडिया डिझाईन’ या नव्या व्यवसायाचे कर्जत शहरात उद्घाटन करून व्यवसाय क्षेत्रात नवे पाऊल टाकले आहे.

(Business) डिजिटल युगात फोटो एडिटिंग, सोशल मीडिया डिझाईन, पोस्टर निर्मिती आदी सेवांची वाढती गरज लक्षात घेऊन हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. स्थानिक युवकांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
युवकांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करून आत्मनिर्भर व्हावे, असा संदेश सचिन थोरात पाटील यांच्या या उपक्रमातून मिळत आहे.

सचिन, तुझ्या नव्या व्यवसायासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, असा शुभसंदेश राहुल तात्यासाहेब नवले यांनी दिला.

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai

Share This Article