मुंबई | १६ जून | प्रतिनिधी
(Bureaucrac) राज्यात गेल्या काही दिवसांत विविध दुर्घटनांमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत.
(Bureaucracy) मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी लोकल रेल्वेमधून पडल्यामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर या विषयावर उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत रेल्वे, मेट्रो, पोलीस, महानगरपालिका तसेच प्रशासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आणि समन्वयात्मक कृती यावर सविस्तर चर्चा झाली.
(Bureaucracy) मुख्य सचिवांनी रेल्वे प्रवासात होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रवाशांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना तातडीने जारी करण्याचे निर्देश दिले. तसेच स्थानकांवरील गर्दी नियंत्रण, प्लॅटफॉर्मवरील सुरक्षितता, फेरीवाल्यांवर नियंत्रण, सीसीटीव्ही निरीक्षण यांसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यावर भर देण्यात आला.

